दीक्षाभूमी देसाईगंज येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
मुनीश्वर बोरकर 
 संपादक गडचिरोली 


लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सर्व प्रथम भगवान बुद्धांना वंदन करून छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. उद्घाटक मारोती जांभूळकर सर डॉ. तर प्रमुख वक्ते जागेश्वर माने सर, डॉ.संजय मेश्राम सर, वैद्य सर, शेंडे सर यानी शाहू महाराजांच्या महान कार्याचा आढावा घेतला तसेच त्यांच्या जयंती बद्दल उपयुक्त माहिती आपल्या भाषणात विषद केली.
तर अध्यक्ष विजय मेश्राम साहेबांनी शाहू महाराजांनी बहूजनांवर केलेल्या उपकाराची जाण ठेऊन सर्वांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडने गरजेचे आहे असे म्हटले.
कार्यक्रमाचे आयोजन सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे करण्यात आले होते. संचालन डॉ. वंदना घोंगडे तर आभार सरीता बारसागडे यांनी केले तर कार्यक्रमा करीता समिती च्या अध्यक्ष कविता मेश्राम, सचिव ममता जांभूळकर, उपाध्यक्ष श्यामला राऊत व सदस रत्नमाला बडोले, यशोदा मेश्राम,गायत्री वाहने, लीना पाटील, सुनीता नंदागवळी, विद्या टेंभुर्णे,प्रतिभा बडोले, प्रतिमा शेंडे वैद्य मॅडम यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments