.
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
चांमोर्शी:- तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला चांमोर्शी ते हरणघाट राज्य मार्ग गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डेमय झाल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले होते त्यासाठी हा रस्ता नव्याने बांधणी करावी म्हणून सतत पाठपुरावा करण्यात येत होता अखेर शासनाने दखल घेत बांधकाम केले मात्र दोन, तीन की मी. रस्त्याचे काम झालेच नाही त्यामुळे ते दोन तीन की मी रस्ते खड्डेमय झाले असून काही भाग झाला तोही खड्डेमय झाला असून जागोजागी खड्ड्यात पाणी साचले असल्याने त्या रस्त्यांनी वाट कुठून काढायची त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा अशी स्थिती त्या रस्त्याची झाली असल्याने तो रस्ता धोकादायक ठरला असल्याने आता कुटून जायचे असा प्रश्न शिक्षक परिषदचे विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी उपस्थित केला आहे
चामोर्शी ते हरणघाट राज्य मार्ग ३७० हा रस्ता खड्डेमय झाल्याने या सततच्या मागणीने या रस्त्याचे बांधकाम मागील वर्षी पार पडले मात्र फोकुर्डी ते चाकलपेठ व हा दोन तीन की मी रस्ता न झालाच नाही तर चामोर्शी ते डांबर प्लांट पर्यंत चा ही रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असल्याने पावसाळ्याच्या काळात त्या खड्ड्यात पाणी साचले असल्याने नागरिकांना, वाहनधारकांना धोकादायक ठरले आहे आता त्यातून वाट कुठून काढायची असा प्रश्न वाहन धारकांना सतावीत आहे
सध्या या रोडची अवस्था बिकट झालेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जीव टांगणीला लागला असताना अन् पावसाळ्याचे दिवस असताना ते खड्डे अद्याप बुजवू शकले नाही याचे आश्चर्य वाटत आहे . तसेच आजूबाजूचे विद्यार्थी शिक्षणाकरिता मध्यवर्ती ठिकाण म्हणून भेंडाळा गावाची ची निवड करतात इथे येत असतात. त्यामुळे अपघातात व जीवित हानी होऊ नये याकरिता लवकरात लवकर खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी संतोष सुरावार यांनी केली आहे
बॉक्स:- मागील वर्षी पासून शिक्षक परिषदने हरण घाट ते चामोर्शी हा रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता त्याची दखल घेत शासनाने मागील अर्थसंकल्पात सिमेंट काँक्रिट रस्ता मजबुतीकरणा करण्याची तरतूद केली त्याबद्दल शासनाचे अभिनंदन
. .
Post a Comment