गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली - एका जखमी रुग्णाला सामान्य रुग्णालय गडचिरोली वरून नागपुरला रुग्णवाहिकेने नेत असतांना वाटेतच रुग्णवाहिकेने पेट घेतला परंतु चालकांच्या शर्तकतेमुळे रुग्ण , डॉक्टर व चालक बाल - बाल बचावले मात्र रुग्णवाहिका पेट घेतल्यामुळे नुकसान झाली .
दि. २८ ला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील रुग्ण अतुल लोणारे या जखमी रुग्णाला नागपुरला हलविण्यात येत असतांना दुपारच्या सुमारास उमरेड - भिवापूर रोडवर १०८ रुग्णवाहिका क्रंमाक एमएच १४ सी एल ०५१७ या राष्ट्रीय महामार्गावर गोंडबोरी जवळ रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला चालक संघशिल खुशाल उंदिरवाडे वय 30 राहणारा येनापुर यांच्या वेळीस लक्षात आल्याने गाडी थांबवुन रुग्ण , डॉक्टर यांना गाडीतुन उतरवून रुग्णवाहिकेने क्षणातच पेट घेतला. अग्निशामक दलाच्या गाड्या आल्यात. पोलीसही घटनास्थळी पोहचले त्यांनी शर्तीने प्रयत्न केला परंतु रुग्णवाहीकाने आगीचा डोंब घेत जळून खाक झाली. रुग्णवाहिकेत असलेलाऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Post a Comment