जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने वृद्ध महिलेवर केला हल्ला, वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील घटना..


गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
7822082216


आरमोरी
गडचिरोली, वडधा परिसरातील सुवर्ण नगर गाव जंगल लगत असून गावातील वृद्ध महिला जंगलामध्ये टोळी वेचण्याकरिता गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला केल्याने महिला ठार झाल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास
कक्ष क्रमांक 10 मध्ये घडली. मिराबाई आत्माराम कौवे (77, रा. सुवर्णनगर देलोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार
वडधा परिसरातील खेड्यापाड्यातील लोकांना कोणतेही कामधंदे नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलातील टोळी , मोह वेचून आणून त्याची विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत असतात . सुवर्ण नगर येथील मिराबाई कोवे नामक वृद्ध महिलेला काम करणे शक्य होत नसल्याने गावाला लागूनच असलेल्या
जंगलामध्ये टोळी वेचण्याकरिता गेली असता अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने मिराबाई कोवे या वृद्ध महिलेवर हल्ला करून तिला ठार केले. घटनेची माहिती वनविभाग व पोलीस प्रशासनात देण्यात आली. पोलीस प्रशासन वनविभागाची टीम घटनास्थळावर दाखल



होवून घटनेचा पंचनामा करून मृत्त्त महिलेचे शव शव विच्छेदनाकरिता  पाठवीण्यात आले.
वडधा पोर्ला मार्गावर मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहतूक असते. अशातच भर दुपारीच रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर सदर घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. असे असतानाच आता वाघाने हल्ला करून महिलेला ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने जंगली हत्ती व वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

0/Post a Comment/Comments