गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
आरमोरी तालुक्यातील
सिरसी केंद्र अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसबी येथे मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात विद्यार्थ्यांच्या जल्लोषात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. नवागतांचे स्वागत विस्तार अधिकारी राजेश वडपल्लीवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. नवागतांना बैल पंडित बसून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शाळेपर्यंत आणण्यात आले.
हा अनोखा सोहळा बघून गावकरी आनंदीत झाले. गावातील सर्व लहान थोर मंडळीचा सहभाग दिसून आला. शाळा प्रवेशोत्सव दिनाचे औचित्य साधून माननीय लाडे साहेब नायब तहसीलदार तहसील कार्यालय आरमोरी यांनी भेट दिली व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चॉकलेटचे वाटप केले. शाळा प्रवेशोत्सव दिनाचे औचित्य साधून शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री प्रकाश चिलबुले मुख्याध्यापक यांनी केले .तर उपस्थिताना माननीय श्री राजेश वडपल्लीवार विस्तार अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील पालक आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवटी गोड जेवणाने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशा प्रकारे 23 जून 2025 हा दिवस शाळा प्रवेशोत्सव दिन म्हणून मोठ्या जल्लोषात जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळा कोसबी येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्री प्रशांत ठेंगरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शेंडे सर यांनी मानले.
Post a Comment