मारोडा सावेला रोड दरम्यान भीषण अपघात, दोन ठार , कसनसुर एक तर दुसरा फुलबोडीचा..


संपादक
 मुनिश्वर बोरकर


 गडचिरोली पोटेगांव - पोटेगांव पोलीस स्टेशन अर्तगत सावेला ते मारोडा रस्त्यावर फोर व्हिलर वाल्यांनी बाईकला जोरदार धडक दिल्यामुळे दोघे जागीच ठार झाले.
आज दि. ९ जुन दुपारी ४.३० चे दरम्यान गडचिरोली वरून पोटेगांव कडे जाणारी फोर व्हिलरने नंबर MH 33 T 3693तर पोटेगांव वरून गडचिरोली कडे




 जाणारी टु व्हिलर (बाईक) नंबर MH 33 AH 3050 मारोडा वरून दोन कि.मी अंतरावर जंगलरोडवर फोर व्हिलर वाल्यांनी
जोरदार धडक दिल्यामुळे या भिषण अपघातात अनुराग रैजी मळवी वय २८ राहणार कसनसुर व दिवाकर विठुल उसेंडी वय 32 वर्ष राहणार फुलबोडी दोघेही जागीच ठार झाले.



या भिषण अपघातात टु व्हिलरचा पुढील भाग चेंदामेंदा झाला. टु व्हिलर मृत्युकांच्या अंगावर पडली होती. मारोडा व सावेला येथील नागरिकांनी घटनास्थळ गाठुन पोलीस पाटिल सिमा मेश्राम हिने पोलीस स्टेशन पोटेगांव येथे फोन लावताच कर्तव्यदक्ष पोटेगांव पोलीस घटनास्थळी हजर झाले. ऍम्बुलन्स बोलविण्यात आली तोपर्यंत दोघां चाही मृत्यु झाला होता. बघाची गर्दी जमली होती. पोलीस पाटिल सिमा मेश्राम सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर मुजुमकर पोटेगांव व सुरेश उसेंडी यांनी सहकार्य केले. मृत्युदेह सामान्य रुग्णालय



 गडचिरोली येथे शवच्छेदेनासाठी नेण्यात आले. पोटेगांव पोलीसांनी मर्म दर्ज करून अधिक तपास सुरु आहे. यात मात्र फोरव्हिलर पसार न होता लोकांनी त्याला अडवून धरले पोटेगांव पोलीसा कडून अधिक तपास सुरु आहे.

0/Post a Comment/Comments