संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - १ जुलै मंगळवारला भारत मुक्ती मोर्चा , आरपीआय व सहयोगी संघटनांच्या तर्फे भारत बंद करण्यात येत आहे . हे आंदोलन भारतातील ३६ ही राज्यात बंद करण्यात येत आहे . ईव्हीएम हटाओ बॅलेट पेपर लाओ , ओबीसींची आणि सर्व जातींची जातनिहाय जनगणना करा , महापुरुषांचा अपमान करण्याऱ्यांवर कठोर कार्यवाही करावे , महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे , वक्फ संशोधन विधयेक २०२५ असंविधानिक आहे ते रद्द करावे , आदिवासींसाठी अनुसूची ५ वी व ६ वी लागू करावी , अशा विविध मागण्यासांठी भारत बंद करण्यात येत आहे .
या बंद मध्ये बहुजन बांधवांनी दुपारी ११ . ३० वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे एकत्र येऊन सहभागी व्हावे असे भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद राऊत यांनी कळविले आहे.
Post a Comment