नगरी ते पोर्ला नवीन रोडवर बाजूचीच माती साईड बम मुरूम म्हणून भरत आहेत, ठेकेदाराची संकल...


संपादक
 मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील नगरी ते पोर्ला दिड कि.मी सिमेंट क्राकेट चा रस्ता बनत असुन रोड च्या दोन्ही बाजुला साईट भरणे म्हणून मुरुमच्या भरण्याऐवजी बाजुचीच माती खोदुन तो मुरुमच होय म्हणुन साइड भरण्याची नामी शक्कल ठेकेदारांनी लढविली आहे. याकडे मात्र बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्याच्या दोन्ही साईडला मुरूम आणुन भरायला पाहीजे परंतु ठेकेदारांनी पैसे वाचविण्यासाठी रस्त्याच्या कळेची माती खोदुन मुरुम म्हणुन भरण्याच्या सपाटा ठेकेदाराकडून सुरु आहे. माती खोदतांना रस्त्यावरील मैलाचा दगडही जमीन जोस्त करीत आहेत.
पोर्ला - फॉक्टरी वरून जाणारा नगरी गावापर्यंतचा सिंमेंट कॉक्रीट च्या नविन बांधलेल्या रस्त्यावर अवघ्या १५ दिवसातच रस्तावर गिट्टी उखळली आहे. सदर कामही याच ठेकेदाराकडे असल्याचे कळते. अश्या निकृष्ठ दर्जाच्या होत असलेल्या रस्याची योग्य चौकशी करून सदर ठेकेदारांची लायसन्स रद्द करावी व अश्या ठेकेदारास काळ्या यादित टाकावे अशी मागणी पोर्ला - नगरी वासीयाकडून होत आहे.

0/Post a Comment/Comments