रॉउड ऑफिसर घोट भारत निमरट यांचा अपघाती मृत्यू...

. संपादक
 प्रा. मुनिश्वर बोरकर


 गडचिरोली. घोट - वनविभाग कार्यालय घोट येथील कार्यरत रॉऊड ऑफीसर ( RO ) भारत निमरट वय ५२ वर्ष यांचा आलापल्ली मुख्य वनविभाग कार्यालयात जातात अपघात होवून निधन झाले.
भारत निमरट हे घोट वनविभाग कार्यालयातून कर्तव्यावर मुख्य वनविभाग कार्यालयात आलापल्लीआपल्या टु व्हिलर ने जात असता दि. २७ मे दुपारी २ चे सुमारास वादळी -वारा पाऊस सुरु असतानांच वाटेत वेलगुर जवळ गायीचा कळप गाडीलाआडवा आल्यामुळे त्याचा अपघात झाला. अहेरी पोलीसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय अहेरी येथे हलविले परंतु दुदैवाने दवाखाण्यातच त्याचा मृत्यु झाला.
भारत निमरट यांच्या पश्चात दोन मुले , पत्नी , आई अशा परिवार असुन त्यांच्या निधनामुळे वनविभाग घोट व घोट परिसरात हळहळ व्यक्त करीत होते. शवविच्छेदनानंतर त्यांचे प्रेत घोट येथे आणण्यात आले त्यांची अत्यविधी आज दुपारी २ वाजता घोट स्मशानभुमी येथे होणार आहे.

0/Post a Comment/Comments