गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली.
गडचिरोली - आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे हत्तीचा कळप चक्क गावातच फिरला आणि गावकऱ्यांनी हत्ती पाहण्याकरीता काही शेल्फी काढण्याकरीता तर काही नागरिक हत्तीला गावाबाहेर हाकलून लावण्याकरीता एकच गर्दी जमली होती. आज दि. ११ मे २०२५ पहाटेच्या ६ चे सुमारास हत्तीचा कळपातील दोन हत्ती मानापूर गावात शिरले व त्यांनी इंदिरा सहारे ६० हिला सोंडाने बाजुला फेकले.या इतक्यात गावकरी गोळा झाले त्यामुळे हत्ती
मानापुरच्या डोंगराच्या दिशेने गेलेत. वनविभाग कार्यालय देलनवाडी यांना माहीती मिळताच सदर चंमु मानापूर पोहचले असता हत्ती पळाले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी इंदिराबाईला ग्रामीण
रुग्णालय देलनवाडी येथे हलविले. मानापूर - देलनवाडी परिसरात हतीची दहशत पसरली असुन वनविभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी जावकऱ्याकडून होत आहे.
Post a Comment