.
गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली .
गडचिरोली - गडचिरोली शहरात दि. २४ मे चे रात्रौ २ वाजताच्या सुमारास दोन हत्तीचे दर्शन झाले असुन सालईटोला वरून दोन हत्ती चक्क शहराच्या लांजेडा इंदिरा नगरच्या प्रमुख मार्गाने आवागमन करीत होते
गडचिरोली जिल्हयात जंगली हत्तीचा हैदोस वाढलेला आहे. कुरखेडा तालुक्यात कधि आरमोरी तालुक्यातील सुर्याडोंगरी ' जेप्रा , देलनवाडी - मानापूर तर गडचिरोली तालुक्यातील जेप्रा ' महादवाडी , गुरवळा , वाकडी च्या जंगलात हत्ती आल्याचे ऐकावयास मिळतो. दि. ११ मे ला आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे पहाटेच्या सुमारास दोन हत्ती गावाच्या मुख्य मार्गाने जात होते. जातांना वाटेत इंदिरा सहारे ह्या महिलांना जखमी केले होते.
परंतु आज दि. २४ मे ला गडचिरोली शहराच्या मुख्य मार्गाने वर्दळीच्या ठिकाणावरून लांजेडा इंदिरानगर मार्ग जाणे म्हणजे गडचिरोलीकरांना चक्क आश्चर्यांचा धक्काच म्हणावे लागेल. सदर दोन हत्ती गडचिरोली च्या मुख्य मार्ग गडचिरोली - लांजेडा मार्गाने जात होते आता ते चांदाळा - गुरवळा - वाकडी च्या जंगलात गेल्याचे कळते. हत्तीच्या दर्शनाने गडचिरोली शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
Post a Comment