गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली सावली - सावली तालुक्यातील केरोडा ( जाम्ब) येथील दारू विक्रेता व दारू पिणाऱ्याच्या वादातून तुला पाहुण घेईन , तुझा मॅर्डर करीन असे म्हणता - म्हणता दि. १३ चे रात्रौ ९. १५ चे दरम्यान दारू विक्रेता गिरिधर वालदे यांनी व्याहाड बाजार येथील मन्चुरी विक्रेत्या २-४ गुंडाना बोलावून चक्क पाहता - पाहता लोकांच्या समोर शमिर खंडारे वय २१ वर्ष यांच्या पोटावर चाकुने १०-१२वार करून मॅर्डर केला असता शमिर हा जागीच ठार झाला. मॅर्डर करणारे म्हणत होत भाऊ आमच्या पाठीसी आहे
भाऊच आम्हाला सोडवणार भाऊ की जय! असे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगीतले. सावली तालुक्यात व व्याहाड वैनगंगा नादिघाटावर असंख्य दारु दुकानाचे परवाना धारकांचे दारू दुकानअसतांना सुद्धा सदर परिसरात सावली पोलीसांच्या आर्शिवादाने मोहफुलाची व देशी निपाची अवैध दारू विक्री सर्रास सुरु आहे.
दि. १३ मे च्या रात्रौ ८ चे दरम्यान केरोडा गावातील शमिर खंडारे दारू पिण्याकरीता गावातील गिरिधर वालदे नामक दारू विक्रेता यांचे घरी गेला असता या दोघात दारूवरून बाचाबाची झाली व दारू विक्रेत्याने शमिर याला चक्क जिवे मारण्याची धमकी दिली असता गिरिधर ह्याने व्याहाड ( बाजार ) येथील २-४ गुंडांना व आपल्या मुलाला बोलावून चक्क केरोडा
तलावाजवळील भर चौकात गुंडांच्या मदतीने शमिर चा पोटावर सपासप १०-१२ वार करून शमिरला जागीच ठार केले. मॅर्डर करतांना भाऊ आमच्या पाठीसी आहे असे म्हणत होते असे गावकऱ्यांनी सांगितले. शमिरच्या भावाने सावली पोलीस ठाण्यात दिलेल्या रिपोर्टनुसार सावली पोलीस तात्काळ केरोडो मॅर्डर स्पॉटवर पोहचले .मॅर्डर करणारे चारही आरोपी रात्रौच फरार झाले असता त्यांच्या मोबाईल नंबर वरून व त्यांच्या
नातेवाईकावरून सावली पोलीसांनी अवघ्या तिन तासातच रात्रौच वेगवेगळ्या गावातुन चारही आरोपींना पकडले व रात्रौच मुख्य आरोपी शाहील मुकेश शडमाके १०वी नापास सन २०२५ वय १६ रा. व्याहाड (बाजार) पियुष सुरेश लाटलवार वय १८ वर्ष १२वी नापास
यावर्षीच व्याहाड (बाजार) दोघेही मंन्चुरी विक्रेत तर गिरिधर पत्रुजी वालदे ४७ वर्ष केरोडा , गिरिधर चा मुलगाअभय गिरिधर वालदे वय २५ वर्ष रा.केरोडा धंदा पॉथालाजी व्याहाड ( बाजार ) येथे या चौघांनाही सावली पोलीसांनी पकडून जेरबंद केले. शमिर यांचे प्रेत ग्रामीण रुग्णालय सावली येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते. शमिरच्या पश्चात फक्त म्हातारी आई व लहान भाऊ मजुरी करणार असुन केरोडा गावात त्यांच्या अश्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होते. खेळ्यातील मॅर्डर ची घटना बघता चंद्रपूर sp ' Dysp , क्रॉईम ब्रॉच चंद्रपूर दि. १४ मे २०२५ ला घटनास्थळी आलेले होते. मॅर्डर करणारे चारही व्यक्ती पौबुर्णा - गडचांदुर पर्यंत रात्रौच पोहचले कसे यांच्या मदत करण्यामागे कुणाचा तरी हात असावा अशी शंका येत असुन मॅर्डर करतांना भाऊ आमच्या पाठीसी आहे. तोच आम्हाला सोडवणार असे का म्हणत होते. तो भाऊ राजकिय नेता कोण ! याचा शोध सुद्धा सावली पोलीसांनी घेणे महत्वाचे आहे.
Post a Comment