अडपल्ली ग्रामसेवक दिलीप मेश्राम अखेर निलंबित, गैरव्यवहार अखेर भोवला...

 संपादक 
मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली.


गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील अवघ्या तिन कि.मी अंतरावरील अडपल्ली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांनी केलेला गैरव्यवहार प्रकरण शिद्ध झाल्यामुळे त्यांना जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी निलबित केले.
अडपल्ली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक दिलीप मेश्राम हे गेल्या ७ वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत होते. त्यांनी २०२१ मधे निकृष्ट दर्जाची कामे करणे . विना टि.पी ची अवैध रेती उचल करणे , ई. टेंडर न करताच साहित्याची खरेदी करणे , अंदाजपत्रका शिवाय कामे करणे , ऑनलाईन आराखडयात मंजुर रकमेपेक्षा जास्त खर्च करणे ' कोटेशन ग्रामपंचायत च्या सभेत मंजुर न करणे , बांधकाम कामाकरीता मंजुरी न घेणे , घरटॅक्स वसुली केलेली रक्कम बॅकेत जमा न करता अफरातफर करणे . खरेदी रकमेच्या बिलातून २ टक्के जीएसटी न भरणे , स्वतःच्या मुलाच्या नावाने ई. टेंटर भरणे अश्या गैरकारभाच्या अनेक बाबी चौकशीत लक्षात आल्यामुळे प .स च्या गटविकास अधिकारी यांनी सदर प्रकरण सि. ई ओ गडचिरोली यांना माहीती सादर करतांच ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांना निलंबित करण्यात आले.
सदर गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार सन २०२१ मधेच करण्यात आली होती परंतु ग्रामसेवक मेश्राम हे ग्रामपंचायत सोडुन दररोज बिडिओ गडचिरोली यांचेकडे चकरा मारत होते टिळा लावून हभप चे मार्गदर्शन अधिकाऱ्यांना सांगुन गोड गोड बोलून भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करीत होते. तो मी नव्हेच असे सांगत होते परंतु बिडिओ ने मेश्राम यांची दाल गलु दिले नाही शेवटी ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांना भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित व्हावे लागले. मेश्राम यांची चौकशी करण्याकरीता बिडिओ ने तब्बल एक वर्ष लावले याचेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments