सुरजागड लोहखनिजाच्या ट्रकने भर चौकात एकाला उडविले, एक ठार तर दुसरा सुखरूप..

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
संपादक
 मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली.




गडचिरोली - सुरजागड लोह खनीज भरून येणारी ट्रक इंदिरा गांधी चौकातील ट्राफीक पोलीस चौकी गडचिरोली चौकात विरुद्ध दिशेने येणारी टुव्हिलरवाल्याला ठोकल्यामुळे टुव्हिलर वाला मागचा बसलेला व्यक्ती ट्रक च्या चक्यात दबल्या गेला व जागीच ठार झाला.



आज दिनांक २५ मे सांयकाळी ६.३० चे दरम्यान सुरजागड वरून लोह खनीज घेऊन छतीसगड जाणारी ट्रक चामोर्शी रोड ते धानोराकडे टर्निंग घेत असतांना आरमोरी वरून धानोरा रोडकडे जाणारी टु व्हिलरला टूक ने चौकातच ठोकल्यामुळे गणेश चौधरी नामक वय २८ वर्ष राहणार मुल हा ट्रकच्या चंक्यात अडकला व जागीच ठार झाला. आज रविवार बाजार असल्यामुळे सिंग्नल बंदच होते.
राहुल चौधरी मुल हा टु व्हिलरच्या मागे बसला होता तर त्याचा मित्र राहुल यांला भेटायला आला होता. गणेश हा खादी ग्रामोद्योग चंद्रपूर येथे नोकरीवर होता आज रविवार सुट्टी असल्या कारणामुळे तो मित्राला भेटायला गडचिरोली आला होता.
इंदिरा गांधी चौकात बघ्यांची तुफान गर्दी जमली होती. ट्राफीक जॉम झाली होती. ड्रायव्हर स्वतः पोलीस स्टेशन गडचिरोली जमा झाला.
सत्ताधारी पक्षाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे आपल्या असंख्य कार्यकर्ता सोबत पोलीस स्टेशनला आपला मोर्चा वळविला तर विरोधी पक्षवाले गप्प बसले.ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या सोबत चर्चा करून दर रविवारी ट्राफीक पोलीस ठेवा यापुढे असे अपघात घडता कामा नये सुरजागडच्या ट्रकाने अनेकांचा जिव घेतला. मी स्वतः जातीचे लक्ष घालणार , एक महिन्यानंतर मोठा स्टॉप कर्मचारी येणार आहेत असे ठाणेदारांनी उपस्थितांना सांगीतले. ठाणेदार सिंगनजुडे सोबत बातचित करतांना भाजपाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे , भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे , शिवसेनेचे नेते (शिंदे गट ) हेमंत जम्बेवार , रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर व विवेक धोंगडे आदि उपस्थित होते.सोमवार रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सुरजागड लोह खनीजाचे ट्रक या मार्गाने बंद करावे पोलीसांनी आवागमन करणाऱ्या गाड्यांच्या स्पिडवर नियंत्रण ठरवावे.


आज सकाळी याच जागेवर अपघात घडला होता. एकाला दवाखण्यात भरती करण्यात आलेले आहे.

0/Post a Comment/Comments