बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सावलीत भंते ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा निघाला..


संपादक 
मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


सावली - बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सावली येथे पुज्य भन्ते ज्ञानज्योती संगारामगिरी यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयावर आज दि. 3 जुन ला दुपारी २ वाजता भव्य मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला.
भन्ते ज्ञानज्योती यांनी तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पन करून सदर मोर्चा सावली शहराच्या प्रमुख मार्गानी जावून तहसिलदार सावली यांना निवेदन दिले तर



 मोर्चाचे रूपांतर माता रमाई महाविद्यालय येथे सभा घेण्यात आली. यात भन्ते ज्ञानज्योती आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की वेगवेगळ्या धर्मात त्यांचे मंदिर आहेत त्याचप्रमाणे राजा सम्राट अशोकाने बुद्धगया येथे बौद्धगया महाविहार बांधुन ठेवले मग त्यांचेवर पंडयाचे वर्चस्व कसे तेव्हा बौद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्धाच्या ताब्यात घ्यावे आमचा तो हक्क आहे अधिकार आहे.


याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , शेड्युल्ट कॉस्ट फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे , प्रा. प्रतिज्ञा पिंपळे चंद्रपुर, प्रा. दिवाकर उराडे , प्रा. ए.आर. दुधे , कोमल रामटेके चंद्रपूर , मुकुंदा मेश्राम आदिचे बौद्ध धम्माप्रती मार्गदर्शन लाभले.



सभेचे प्रास्ताविक रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे यांनी तर संचलन रिपाई तालुकाध्यक्ष किशोर उंदिरवाडे यांनी केले.
मोर्च्यात प्रा. मनोहर प्रल्हाद गेडाम , उदय गडकरी , समता सैनिक दलाचे आशिष गेडाम , पवन मेश्राम , लाजर कांबळे , पिंपळे साहेब , गुरुदास रामटेके , भाष्कर अभारे , लोकमत दुधे , राहुल रायपूरे , मोरेश्वर चंदनखेडे ' चंद्रप्रभा गेडाम , चंदाताई गेडाम ,शंकर दुधे , भावेश दुधे ' पुजा भडके , कांता दुधे सुमन उराडेआदिसहीत सावली तालुक्यातील बहुसंख्य धम्मबंधु उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments