कोंढाळा (मेंढा )रेती घाट प्रकरण िभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्याकडून जिल्हाधिकार्‍यांना पत्र..

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
गडचिरोली 


गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील मेंढा घाट मधून वैनगंगा नदी पात्रातील रेतीला विदर्भात सोन्याचा भाव मिळते याच संधीचा फायद्या घेऊन या घाटातील रेती नागपूर , उमरेड, नगभिड, अर्जुनी, कुरखेडा, अशी दूरवर सोन्याच्या भावात विकली जाते याच संधीचा फायदा घेऊन या रेती घाटातील रेती मागील ८-१० महिण्यात ४०००-५००० ब्रास रेती विकल्या गेली . ह्या साठी तलाठी , मंडळ अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याने हा सर्व प्रकार घडला हे नाकारता येत नाही कदाचित या मध्ये महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा शामिल राहू शकतात
कोंढाळा मेंढा रेती घाटात रात्री चक्क पोकलांड टाकून रेती तस्करी ची तस्करी केली जात असे हा सर्व प्रकार मंडळ अधिकारी के.पी ठाकरे यांच्या देखरेखी मध्ये घडला आणि या मध्ये शासनाला करोडो रुपयांचा चुना महसूल अधिकारी यांनी लावलेला आहे या मोबदल्यात त्यांना महिण्यकाठी पॅकेज ठरलं असायचं
तरी संबंधीत प्रकरणात त्या सा. जा.चे मंडळ अधिकारी के. पी ठाकरे दूरध्वनी संभाषण तपासावे जेणे करून सत्यता समोर येईल अशी तक्रार दिनांक 29/4/2025 ला कैलास बगमारे भाजपा जिल्हा सह संयोजक यांनी आपल्या तक्रारी द्वारे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्या कडे केली मात्र यावर काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी तक्रार विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्या कडे केली
ह्या तक्रारीला अनुसरून विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांचे कडून पत्र क्रमांक . मशा/कर्या -7(4)/कावी -471/2025 नुसार मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांना उचित आवश्यक कार्यवाही करण्या संदर्भात पत्र पाठवले ह्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब काय कारवाई करतात हे पाहणे गरजेचे राहील

0/Post a Comment/Comments