चामोर्शी.
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
चामोर्शी - नगरपंचायत चामोर्शी च्या अग्नीशामक गाड्या , घंटा गाडया कर्मचाऱ्यांच्या गाडया व स्वर्गरथ गाड्या नेहमीच बुद्ध विहार चामोर्शी च्या खुल्या जागेत चौकात राजरोजपणे उभ्या ठाकल्या दिसतात जनूकाही बौद्ध विहार हे नगर पंचायतचे पार्किंग बनले आहे तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांची याची नोंद घेऊन त्या ठिकाणी गाड्या उभ्या करू नये अशा ईशारा बौद्ध समाजाचे सचिव सत्यवान सोरते , प्रतिभा कोंटागले , वर्षा सहारे ,बंडु कुळवे , हस्ते भगत यांनी दिलेला आहे.
नगर पंचायत चामोर्शी च्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या ठेवण्याकरीता नगर पंचायत च्या समोर गुरुवार बाजाराचा दिवश वगळता बाजाराच्या पंटागणात सदैव गाडया ठेवू शकतात परंतु न .प चे कर्मचारी घंटा गाड्या , अग्नीशामक गाडी स्वर्गरथ गाडी नेहमीसाठी बुद्ध विहार चौक चामोर्शी येथे पार्कीग करतात त्यामुळे बौद्ध विहारात जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागतो . नगर पंचायत बाजाराच्या अवती भोवती राहणारे लोक नगर पंचायतीची जागेवर अतिक्रमण करीत आहेत हे
मात्र मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिसत नाही मात्र आपल्या कार्यालयीन गाड्या बौद्ध विहारात समोर ठेवून तिथे अतिक्रमण तर करणार नाही ना ! तेव्हा नगर पंचायत चामोर्शी च्या विहारासमोर ठेवत असणाऱ्या गाड्या त्वरीत हटवाव्यात अन्यता तिव्र आंदोलनाचा ईशारा बौद्ध समाजाचे सचिव सत्यवान सोरते , महिला आघाडी प्रमुख प्रतिभा कोटांगले , वर्षा सहारे , बंडु कुळवे , हस्ते भगत आदिनी दिलेला आहे.
Post a Comment