महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनी घेतली नगरपरिषद मुख्याधिकारी यांची भेट. गडचिरोली नगरातील समस्यावर केली चर्चा..



गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
गडचिरोली 


महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना गडचिरोली तर्फे नगर परिषद गडचिरोली मुख्यधिकारी यांची भेट घेऊन शहरातील पाट्या मराठी मध्ये न झाल्याचे निदर्शनास आणून दिले व गटर लाईन बद्दल पण चर्चा करण्यात आली व शहरातील मेन रस्त्यावरील मोकाट जाणवरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा कारण अपघात होण्याची दाट शक्यता आहे अशे निदर्शनास आणून दिले व त्या बद्दल निवेदन देण्यात आले सर्व मुदयांवर सकारात्मक चर्चा झाली लवकरात लवकर तोडगा काढू अशे मुख्याधिकारी यांच्या तर्फे आश्वासन देण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष गडचिरोली राजेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे इंजि अंकुश संतोषवार, मनविसे शहराध्यक्ष शुभम कमलापूरवार, मनविसे उपशहराध्यक्ष आशिष खडसे, मनविसे सचिव आकाश कुळमेथे, पवन कोसणकर, प्रसाद आसमवार व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments