गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली
संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
गडचिरोली - शहरापासुन अवघ्या एक कि.मी अंतरावरील जंगलातील पुलीया च्या जवळ वळणावर दोन दुचाकीची आपने सामने जोरदार धडक झाली यात राकेश मुनघाटे हा जागीच ठार झाला तर अन्य तिन जन जखमी झालेत. यात टु व्हिलर गाडी क्रंमाक MH 34 AG 7 l 57 चा पुढील भागाचे तुकडे तुकडे झालेत.
दि. २९ जुन सकाळी ९. 30 चे दरम्यान राकेश प्रभाकर मुनघाटे वय 30 दुर्याधन विलास चौधरी वय २९ छत्रपती विनायक चौधरी वय ४० हे एकाच गाडीने तिघेही विहिरगांव येथे शेतीच्या कामावर जात होते यात मृत्युक राकेश मुनघाटे गाडी चालवित होता.
दुसऱ्या दुचाकिने अनुष्का प्रमोद धाईत १५ कन्नमवार वार्ड तर अक्षरा सदानंद सुरणकर १५ इंदिरानगर ह्या जंगलात शेल्फी काढण्याकरीता परत येत असतांना पोटेगांव रोड पहिला पुलीयाच्या जवळच वळणावर दोन्ही टुव्हिलर ने जबरजस्त आमने सामने धडक दिली व यात एक ठार तिन जखमी झाले .
गडचिरोली पोलीसांना माहीती मिळताच घटनास्थळी पोहचले गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले तर मृत्युक राकेश मुनघाटे यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. ट्रॉक्टर ड्रायव्हर राकेश मुनघाटे यांच्या मृत्युमुळे कुराडी (महादवाडी ) गावात शोककळा पसरली होती .
अनेक शाळेकरी विद्यार्थी ट्युशन झाल्यावर पोटेगांव मार्गात जंगलात फोटो काढण्याकरीता , गाडीने फिरण्याकरीता मौज मस्ती करण्याकरीता नेहमीच जात असतात यात मात्र पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष पुरविणे महत्वाचे आहे. याच रस्त्यावर जंगलात कधि हत्ती , वाघ , बिबट वावरतांना दिसतात.
Post a Comment