जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्या बद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने जिल्हा शल्यचिकिस्तक यांना निवेदन सादर,..


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
गडचिरोली 


महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली तर्फे शल्य चिकिस्तक सामान्य रुग्णयालय गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. महिला रुग्णालय गडचिरोली येथे बेड्स ची संख्या वाढवावी, रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन योग्य त्या उपचार पद्धती पुरवावे व रुग्णांची गैरसोय होणार नाही या कडे विशेष लक्ष द्यावे या बद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष गडचिरोली राजेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे इंजि अंकुश संतोषवार, मनविसे शहराध्यक्ष शुभम कमलापूरवार, मनविसे उपशहराध्यक्ष आशिष खडसे, मनविसे सचिव आकाश कुळमेथे, पवन कोसणकर, प्रसाद आसमवार व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments