सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे पत्राला गटविकास अधिकारी यांच्याकडून केराची टोपली..

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 


देसाईगंज - तालुक्यातील शिवराजपुर गट ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१५ ते २०२० मध्ये १४ वित्त आयोग निधीचा अपहार आणि बोगस कामे यांची चौकशी करून चौकशी अंती दोषी आढळल्यास ग्राम पंचायत अधिकारी आणि पदाधिकारी यांचे वर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा चे पंचायत राज व ग्राम विकास विभाग चे गडचिरोली जिल्हा सह संयोजक कैलास बगमारे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्या कडे केली
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मानसी यांनी दिनांक २२मे २०२५ ला सादर तक्रारी ला अनुसरून ह्या तक्रार अर्जावर योग्य ती कार्यवाही




 करून सदर कार्यवाही बाबत अर्जदाराला परस्पर कळवावे आणि केलेल्या कार्यवाही चा अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे सादर करावा असा पत्र पाठवला
मात्र ह्या पत्राला २० दिवस होऊन सुद्धा कोणतीच चौकशी न झाल्याने गट विकास अधिकारी संगीता खोचरे यांच्या कार्य प्रणाली वर प्रश्न निर्माण होत आहे

0/Post a Comment/Comments