गडचिरोली स्मशानभूमीतील दहन मशीनची दुदैश्या...

 संपादक 
मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली.


गडचिरोली - गडचिरोली शहरातील 2 कि.मी अंतरावरील असलेले एकमेव स्मशानभूमीतील दहन मशीन ची अक्षरख्या दुदैशा झालेली आहे. .४० ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहरात कठाणी नदिघाटावर करोडो रुपये खर्च करून स्मशानभूमी तयार करण्यात आलेली आहे. सदर दहनभूमीची संपूर्ण देखभाल नगर पंचायत गडचिरोली कडून पाहल्या जात आहे. शहरातील काही लोक वैनगंगा नदि ( व्याहाड ) बोरमाळा नदि घाटावर प्रेत नेतात इकडे वर्दळ कमी असतो परंतु कठाणी नदिघाटावर असलेली स्मशानभूमी येथे मृत्युशयाची वर्दळ जास्तच असतो एकेका दिवशाला तिन - चार म्युतांचा आकडा असतो सदर दहनभूमीत तिन दहन करणाऱ्या मशीनी आहेत. त्यापैकी एक मशीन भंगार अवस्थेत जिर्ण झालेलीआहे. त्यातीलच दुसरी मशीनीचे सलाखी तुटत आहेत . दुसरीकडे मागच्या बाजुला असलेली तिन दहन करणाऱ्या मशीनी आहेत परंतु त्या भागात प्रेत नेवून कुणीही पेटवत नाहीत. वर्दळ मात्र जुन्या दहन करणाऱ्या मशीनकडे आहे. परंतु येथील मशीनी भंगार - जिर्ण अवस्थेतआहेत. एकाच वेळेस
तिन तिन प्रेत आलेत तरअश्या वेळेस तारांबळ उडतो .
उभ्या आयुष्य सुखाने जिवन जगणाऱ्या व्यक्तीला मरता वेळेस तरी सुखाने मृत्यु (प्रेताचे ) विल्हेवाट लावण्याची जागा (दहन मशीन ) कडे तरी नगर प्रशासनाने लक्ष घ्यावे व दहन मशीन , पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी गडचिरोली वासीयांकडून होत आहे.

0/Post a Comment/Comments