गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
बामसेफ , भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांचे जिल्हास्तरीय अधिवेशन रविवार दि. ८ जुन ला विश्राम गृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे सकाळी ११.०० ते सायं . ५.०० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे . या अधिवेशनाची अध्यक्षता प्रा . मनोज लोहे पूर्व विदर्भ प्रभारी बामसेफ हे करणार आहेत . अधिवेशनाचे उद्घाटक प्रा . मुनिश्वर बोरकर आरपिआय जिल्हाध्यक्ष आहेत .
या अधिवेशनात सार्वजनिक निवडणूका ईव्हीएमने न घेता मत पत्रिकेवर घेण्यात यावे . ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी . बहुजन महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावे . चलो गाव की ओर अभियान राबविण्यात यावे, इत्यादि विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाला सर्व बहुजन बांधवांनी उपस्थित रहावे , असे भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , दामोधर शेंडे जिल्हा सहसचिव राष्ट्रीय किसान मोर्चा व नरेंद्र शेंडे बहुजन मुक्ती पार्टी यांनी कळविले आहे .
Post a Comment