.
गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
9421734792
गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत ने यावर्षी पावसाळा सुरु होत आहे तरी पण अजून पर्यंत नालीचा उपसा केलेला नाही. दि. २४ मे ला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला त्यामुळे गावातील संपूर्ण नाल्या तुडुंब भरल्या व ग्रामपंचायत ने नाल्याचा उपषा न केल्यामुळे तुडुंब भरलेल्या नाल्या काही ठिकाणी केरकचऱ्यामुळे नालीचे पाणी अडकून नाल्यांच्यावर वाहु लागले तर काही नाल्यामधे ओव्हर फ्लो नाल्या वाहू लागल्या त्यात पोर्ला नविन वस्तीतुन ओव्हर फ्लो वाहणाऱ्या नात्यामधुन दारुच्या रिकाम्या निफाचा ढग वाहत होता.
पोर्ला येथील नाल्यांचा उपषा करण्याकरीता सरपंच व ग्रामसेवक यांच्या निष्काळजीपणामुळे आता नाल्यातुन दुर्गंधी येत असुन मच्छराचाही प्रार्दुभाव वाढला आहे. पाऊस दररोज येतच आहे.
त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याचे नाकारता येत नाही. आमच्या प्रतिनिधीनी पोर्ला गावात फेरफटका मारला असता हा पोर्ला वासियांच्या
आरोग्यासी व जिवासी ग्रामपंचायत कडून खेळ खेळल्या जात असल्याचे ग्रामस्थांची ओरड सुरु होती . गावामध्ये नवीन नळ योजनेचे पाईप टाकण्या करीता सर्व रोड फोडलेले आहेत आणि त्यात आनकीन भर म्हणजे नाल्यांचा उपसा करण्यात आलेला नाही. याला नेमके म्हणावे तरी काय ग्रामपंचायत प्रशासनाचा नाकर्तेपणा कि काय असा प्रश्न गावातील नागरिकांना पडलेला आहे
Post a Comment