मेंढामाल ( ता.सिंदेवाही येथील नरमक्षक वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या महिलांच्या कुटुंबीयांचे मा. खासदार डॉ. अशोक नेते यांच्याकडून सांत्वन..

 

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
संपादक 
मुनिश्वर बोरकर



सिंदेवाही – तेंदूपत्ता तोडणीसाठी डोंगरगावच्या चारगाव कक्ष क्र. २५२ परिसरात गेलेल्या मेंढामाल (ता. सिंदेवाही) येथील तीन महिलांवर नरभक्षक वाघिणीने प्राणघातक हल्ला चढवून त्यांच्या जीवाचा घात केला. या हृदयद्रावक घटनेत कांता बुधाजी चौधरी (६७), शुभांगी मनोज चौधरी (२८) आणि रेखा शालिक शेंडे (५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण घटनेमुळे मेंढामाल गावात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच भाजपाचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी त्वरित मेंढामाल येथे जाऊन मृत महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मृतकांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला.


यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नरभक्षक वाघिणीला तात्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले. “अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वनविभागाने विशेष उपाययोजना राबवाव्यात,” असे स्पष्ट शब्दांत मा.खा. डॉ.अशोकजी नेते यांनी सांगितले.
*ग्रामिण रुग्णालय शिंदेवाही येथे भेट.*
दरम्यान, वाघिणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वंदना विनायक गजभिये या चारगाव (बडगे)येथील महिलेला ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे दाखल करण्यात आले होते.या सबंधित मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी रुग्णालयास भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना धीर देत “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास दिला. यावेळी त्यांनी जखमी महिलेला सुद्धा आर्थिक मदतही देण्यात आली.




या वेळी सिंदेवाही तालुक्याचे महामंत्री नागराज गेडाम, जेष्ठ नेते कमलाकर सिद्मशेटीवार,जेष्ठ नेते गणवीर सर,भाजयुमो ता.अध्यक्ष रितेश अल्मसत, वैद्यकीय अधिकारी डॉ.दुर्गे मॅडम, आदिवासी मोर्चाचे जिल्हा महामंत्री कैलास कुमरे, ता.महामंत्री मुरलीधर मडावी, युवा नेते आशिष सहारे,आशिष चिंतलवार, वि.कार्य.सो.अध्यक्ष अनिलजी ठिकरे,माजी सरपंच वामन कोकोडे,सुमित गजभिये, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments