गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
सावली - सावली तालुका अंतर्गत केरोडा हेटी येथील गुलाब खुशाल सोरते वय 30 वर्ष यांनी याच गावातील अत्यवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले असता मुलीच्या वडीलांच्या तक्रारीनुसार त्यांचेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होवून सावली पोलीसांनी त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की केरोडा येथील गुलाब खुशाल सोरते यांनी याच गावातील एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसुन तिला फुस लावून पळवून नेताना लहान भावाने त्याला विरोध केले असता त्याला मारहान केली असताना अर्जदारांनी पोलीस स्टेशन सावली येथे तक्रार दिली असता गुन्हेगार घरी कोणीच नाही म्हणत त्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले , दोन्ही रिपोर्टनुसार त्यांचेवर कलम ३५२ , 3७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याबाबत त्यांचेवर कलम ४ व ६ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुलुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.
Post a Comment