माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची देविदास नागरे यांच्या मुलांच्या विवाहप्रसंगी चामोर्शी येथील नेणेवार सभागृहात सदिच्छा भेट..

गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली


दिनांक: ०६ मे २०२५

अमिर्झा येथील भाजपाचे जेष्ठ नेते देविदास नागरे यांच्या मुलाच्या विवाह समारंभाचा मंगल सोहळा चामोर्शी येथील नेनेवार सभागृहात आयोजित करण्यात आला होता.


या शुभ प्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी समारंभस्थळी उपस्थित राहून नागरे कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली व नवविवाहित वधू-वरास आशीर्वाद देत उज्ज्वल व यशस्वी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

या समारंभात चामोर्शी पेट्रोल पंपाचे मालक मनेश गांधी जी यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.


0/Post a Comment/Comments