डोंगरगाव येथे व्यायाशाळा खोली मंजूर सदानंदजी कुथे जील्हा नियोजन समिती सदस्य यांच्या प्रयत्नाला यश....गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
फुलचंद वाघाडे 
 जिल्हा प्रतिनिधी 
गडचिरोली..
आरमोरी :- तालुक्यातील डोंगरगाव भू येथे मुलांच्या व्यायाम करण्यासाठी अडचणी लक्षात घेता डोंगरगाव येथील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले सदानंदजी कुथे यांनी सदर मागणीची दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे जिल्हा वार्षिक योजने मधून डोंगरगाव येथे खुली व्यायाम शाळा मंजूर करण्याची सूचना केली होती. या मागणीची दखल घेऊन सर्व प्रस्तावाची पूर्तता करून आज डोंगरगाव भुसारी येथील पटाच्या दाणीवर खुली व्यायाम शाळा उभारण्यात आले आहे.
या व्यायामशाळेमुळे परिसरातील ठाणेगाव ,जुने ठाणेगाव ,नवीन वासरा येथील पोलीस भरतीची तयारी करण्याकरीता त्यांना मदत होईल व युवकांचा आरोग्य सदृढ राहील. या व्यायाम शाळेमुळे नागरिकांनी सदानंद कुथे यांचे आभार मानले.

यासाठी डोंगरगाव येथील सरपंच छायाताई खरकाटे , ठाणेगाव येथील सरपंच वासुदेवजी मंडळवार ,डोंगरगाव येथील उपसरपंच लोमेश सहारे, ग्रा.प सदस्य सचिन कुथे , नीलकंठ बघमारे अक्षय ठाकरे , ग्रा.प सदस्या सुलचना ढोरे , अलका कुंभरे , प्रियंका कुथे ,पूजा चहांदे , विकास पायदलवार , नरेश कुथे यांनी सुद्धा आभार मानले.

0/Post a Comment/Comments