गडचिरोली
सुपर फास्ट
नुज वृतसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
सावली - सावली तालुक्यातील पाथरी येथील तटांमुक्ती अध्यक्षानी अर्जदार यांना मारहान केल्यामुळे अर्जदार गेल्या १५ दिवसापासून फरार असून त्यांच्या बहिणीने पोलीस स्टेशन पाथरी येथे दिलेल्या रिपोर्टनुसार तंटामुक्तीचे अध्यक्ष अमित ठिकरे पाथरी यांचेवर अनु जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन अर्जदार यांना मारहान करण्याऱ्या अन्य ४ व्यक्तीवर गुन्हा दाखल करून फरार माझ्या भावाचा पोलीसांनी शोध घ्यावा अशी मागणी अर्जदारांची बहीण तनश्री दयाल वाघमारे यांनी केलेली आहे. सविस्तर वृत्त असे की घराच्या जमीनीचा वाद सोडविण्याकरीता राजेद्र दयाळ सोनटक्के पाथरी यांनी तंटामुक्ती अध्यक्षा कडे दि १५ जुनलाअर्ज केला परंतु गैर अर्जदार हा तंटामुक्ती अध्यक्षाचा नातेवाईक असल्यामुळे त्यांनी अर्जदारांची बाजु न ऐकता गैर अर्जदाराची बाजु ऐकून अर्जदारास पानटेल्या वरून बोलवून तंटामुक्ती अध्यक्ष ठिकरे व अन्य ४ मिळून अर्जदार राजेंद्र दयाळ सोनटक्के यांना लाथा बुक्यानी मारहान केली व त्याला साल्या मादगी म्हणुन शिविगाळ केल्यामुळे सदर अर्जदार अपमानीत होवून गेल्या १५ दिवसापासून तो फरार आहे. त्यामुळे त्याची बहीण तनश्री हिच्या तक्रारी वरुन पाथरी पोलीसानी तंटामुक्ती अध्यक्ष ठिकरे पायरी याचेवर कलम 323 , 506 , अनु. जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम 3 / । R नुसार गुन्हा दाखल केला. बेपत्ता माझा भावाला पाच लोकांनी मारून तर टाकले तर नसावे ना असा शंसय निर्माण होत असुन त्याचा शोध पोलीसांनी घ्यावा. अन्य ठिकरेचे साथीदारास पकडून गुन्हा दाखल करावा अशी मागणी तनश्री हिने केलेली आहे.
Post a Comment