150 किलोचा केक कापून वंचित तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गडचिरोली येथील गांधी चौकात केली साजरी.... संविधानाला वंचितच वाचवु शकतो प्राध्यापक मुनिश्र्वर बोरकर....

 

दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा 
गडचिरोली - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२४ चा भरगच्य कार्यक्रम इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे सांयकाळी ७ वाजता वंचितचे जिल्हाधयक्ष बाळू ठेभुर्ण यांच्या अध्यक्षतेखाली तर रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमात रोशनाई ' डॉन्स हंगामा व मान्यवरांचे स्वागत व मार्गदर्शनपर पार पडले. वंचितचे बाळू ढेभुर्णे यांचे हस्ते १५० किलोची केक कापण्यात आली . या प्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की संविधान आज केंद्रस्थानी आहे. भाजपाला बदलवायचे आहे तर कांग्रेसला वाचवायचे आहे असे बो लल्या जात आहे. या पुढेही बोरकर म्हणाले की




 संविधान भाजपा बदलवू शकत नाही. आणि बदललेच तर कांग्रेस वाचवू शकत नाही. संविधान फक्त आणि फक्त वंचितचे प्रकाश आंबेडकरच वाचवू शकतात एवढी प्रचंड ताकद व पक्ष कार्यकर्ते वंचितकडे आहेत. वंचितला सहकार्य करा प्रकाश आंबेडकराचे हात मजबुत करा असे बोरकर म्हणाले.
. सदर कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष बाळू ढेभुर्णे , जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसिंगे , महिला आघाडी प्रमुख मालाताई भजगवळी , सिताराम ठेभुर्णेआदिची भाषणे झालीत कार्यक्रमाचे संचलन किशोर भैसारे यांनी केले. कार्यक्रमास हजारोच्या संख्येनी उपस्थिती होती.



0/Post a Comment/Comments