गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
- July 09, 2025
आरमोरी बुरो
सतत मागील दोन ते चार दिवसापासून जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले आहे या अतिवृष्टीमुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत अशातच आरमोरी तालुक्यातील वडधा देशपूर मार्गावर वडधा नजिक एक नाला आहे या नाल्याला पूर आल्याने नाल्यामध्ये कुरंजा येथील एक वयोवृद्ध इसम नाम राजेंद्र विश्वनाथ तुंमराम वाहून गेल्याची घटना घडली आहे. राजेंद्र विश्वनाथ तुमराम हा काही कामानिमित्त वडधा येथे आला असता आपले काम आटोपून सायंकाळच्या सुमारास
तो कुरंजा गावाकडे निघाला मात्र रस्त्यावरील नाल्याला पूर आला होता आणि पुलियाच्या वरून दोन ते तीन फूट पाणी होता. राजेंद्र तुमराम सायकल समवेत नाला ओलांडत असताना त्याच्या तोल गेल्याने पुरामध्ये वाहून गेल्याची माहिती हाती आली आहे.. आमच्या प्रतिनिधीने अशी माहिती दिली की वृत्त लिहे पर्यंत त्याचा शोध लागला नव्हता .
Post a Comment