ठाणेगाव जवळ खाजगी बस पुराच्या पाण्यात अडकली, मदत कार्यानंतर 50 प्रवासी बचावले...


गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
संपादक
 मुनिश्वर बोरकर 



गडचिरोली
गडचिरोली - आरमोरी - गडचिरोली मार्गावरील आरमोरी नजीकच्या ठाणेगांव जवळ गाढवी नदिच्या जवळील भागात नागपुर वरून गडचिरोली येणारी खाजगी ट्राव्हल्स पुराच्या पाण्यात अडकली यात ५० प्रवासी होते. ते सगळे प्रवासी बचावले.
खाजगी ट्राव्हल्स नागपूर वरून दि. ८ जुलै सांयकाळी ७ वाजता धो-धो पावसात निघाली ते आरमोरी जवळील गाढवी नदिचा पुल थोडा उंच असल्यामुळे ड्रायव्हरने रात्रो १० चे दरम्यान बस पुढे काढली परंतु पुढे ठाणेगांव जवळील खोलगट भागात पुराचे पाणी रस्त्यावर होते. ड्रायव्हरचा अंदाज चुकल्यामुळे त्यांनी ट्राव्हल्स चक्क त्या पाण्यातुन काढण्याची हिमंत केली आणि पाण्यातच बस बंद पडली.
आरमोरी चे तहसिलदार व ठाणेदार घटनास्थळी पोहचले व जेसीबी च्या सहाय्याने सदर बस पुराच्या पाण्यातून बाहेर काढली ५० प्रवासांना जेवणाची व्यवस्था केली.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी असे शक्त आदेश दिले की जो ड्रायव्हर अशी हिमंत करीत असेल त्यांच्यावर FRI दर्जा करा. पुराच्या पाण्यातून कुणीही जावु नये असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना दिल्यात.

0/Post a Comment/Comments