गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
आरमोरी तालुक्यातील डार्ली ते वडधा सिरसी मुख्य रस्त्यावर चार ते पाच दिवसापासून एक मोठ्या स्वरूपाचे पळसाचे झाड रस्त्यावर पडल्याने प्रवासधारकांची वाट थांबली आहे .यामुळे कमालीचा त्रास प्रवास धारकांना शाळकरी विद्यार्थ्यांना होत आहे. डार्लिं ते वडधा सिरसी मुख्य रस्त्याने बऱ्याच प्रमाणामध्ये वाहतूक चालत असते यामध्ये शाळकरी विद्यार्थी सुद्धा शिरशीला शाळेमध्ये जात असतात पळसाचे झाड रस्त्यावर पडल्याने विद्यार्थ्यांना सुद्धा याचा नाहुक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर पडलेले पळसाचे झाड ताबडतोब बाजूला ह ठवावे आणि मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करावी असे परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी मागणी आहे.
डार्लिं ते शिरसी या मार्गाने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता एसटी महामंडळ बसेस सुरू केली आहे. मात्र रस्त्यावर झाड पडल्याने एसटी बसेस ला सुद्धा वाहतुकीमध्ये मोठ अडथळा निर्माण झाला आहे.
Post a Comment