पोर्ला येथील जुन्या पी डब्ल्यू डी रेस्ट हाऊस मधून मुरमाचे अवैद्य उत्खनन ,गडचिरोली तहसीलदार कारवाई करणार काय? पोर्ला वासियांचे कारवाईकडे लागले लक्ष...

 गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली -



पोर्ला येथिल इंग्रज कालीन रेस्टहाउस पडक्या अवस्थेत आजही अस्तित्वात आहे. त्या रेस्टहाउस मधून रात्रौच्या अंधाराचा फायदा घेऊन jcb च्या सहाय्याने अवैध्य मुरूमाचा उत्तखणन करून ट्रॅक्टर /ट्रॅक द्वारे गजानन राईस मिल पोर्ला तें नगरी फाटा पर्यंत करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या रोडच्या साईडला भरन भरण्याकरीता टाकण्यात आलेले आहे. याची माहिती पोर्ला चे तलाठी व मंडळ अधिकारी यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ मौका चौकशी करून पंचनामा



 करण्यात आला व तहसीलदार गडचिरोली यांना पाठविण्यात आलेला आहे.पुढील कार्यवाही तहसीलदार साहेब काय करतात याच्या कडे गावातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. तहसीलदार साहेब यांनी शासकीय नियमानुसार पाच पट दंड आकारतील कि धातुर मातुर चौकशी करतील



  अवैध मुरुम चोरी करणाऱ्या ठेकेदारांच्या मुस्क्या आवरतील अशी पोर्ला वासीयांची अपेक्षा आहे.

0/Post a Comment/Comments