गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
देसाईगंज ब्युरो
देसाईगंज - तालुक्यातील गट ग्राम पंचायत शिवराजपूर अंतर्गत शिवराजपूर , उसेगाव, फरी/ झरी अश्या तीन गावांचा समावेश होतो. शासनाकडून दरवर्षी गावांच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात ग्राम पंचायत ला निधी प्राप्त होते आणि त्या निधीमधून गावाचा सर्वांगीण विकास करणे हे ग्राम पंचायत च काम आहे .
मात्र बऱ्याच ठिकाणी मात्र हे कामे निकृष्ट दर्जाचे किंवा कामे न करताच फक्त कागदोपत्री करून शासकीय निधीचा ग्राम विकास अधिकारी, सरपंच , सदस्य यांच्या द्वारे सदर निधीचा अपहार केला जातो . अशाच काहीशा प्रकार घडला आहे तो शिवराजपुर गट ग्राम पंचायत च्या बाबतीमध्ये त्यामधे सन २०१५ ते २०२० या कालावधीत झालेल्या चौदावा वित्त आयोग योजने अंतर्गत झालेल्या शाळेकरिता थंड पाणी चा वॉटर फिल्टर, कचरा कुंड्या, सौऊर्जेवर चालणारे पथदिवे , मुख्य विद्युत प्रवाहाचे पथदिवे आणि आनुषंगिक इतर कामे या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे दिसून येते त्यामुळे त्या ग्राम पंचायत चे नागरिक म्हणून कैलास बगमारे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभगिय अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती देसाईगंज ला वरिष्ठ कार्यायाकडून ग्राम पंचायत च्या चौकशी चे पत्र मिळाले आणि गट विकास अधिकारी खोचरे यांनी चौकशी साठी विस्तार अधिकारी लाडे यांची नियुक्ती केली आणि मागील ७ दिवसा पासून ते चौकशी करीत आहेत .
या प्रकरणात विस्तार अधिकारी यांचे कडून पारदर्शक आणि नी पक्षपात पणे चौकशी ची अपेक्षा संपूर्ण गावकरी मंडळी कडून केली जात आहे.
Post a Comment