गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली
आरमोरी:-
रामपुर चक येथील रेतिघाट नाहरकत प्रमाणपत्र संदर्भात ग्रामपंचायत कासवीच्या उपसरपंच यांना अप्पर आयुक्त नागपूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालावरून पदावरून पायउतार केले त्यामुळे त्यांच्या राजकीय खेळीला डाग लागलेला आहे
सविस्तर वृत्त असे की,अर्जदार रुमदेव सहरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार उपसरपंच प्रवीण ठेंगरी यांच्या विरोधात तक्रार केली.विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, मुंबई कडील परिपत्रक क्रमांक व्हीपीएम-2015/प्र.क्र.306/पंरा-4, दिनांक 11 डिसेंबर 2015 नुसार ग्रामपंचायतीकडून गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्याकरीता द्यावयाच्या ना-हरकत प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतीच्या मान्यतेने ग्रामसचिवांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात यावे" असे नमूद आहे. परंतु प्रकरणात गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र उपसरपंच यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने जितेंद्र वामन शेंडे राहणार आरमोरी यांना रामपूर रेती घाटातील शिल्लक रेतीची विक्री करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र दिलेला आहे सदर बाब त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली यांचेकडे मान्य केलेली आहे.सदर बाब त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नसताना सुध्दा त्यांनी सदर प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे. गैरअर्जदार यांची कृती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) अंतर्गत गैरवर्तन यामध्ये मोडत असल्याने अर्जदार यांचा तक्रार अर्ज मान्य करण्यात यावा. या निष्कर्षाप्रत हे प्राधिकरण आलेले आहे
प्रवीण केवळराम ठेंगरी, गैरअर्जदार यांना यापुढील कालावधीकरीता सदस्य पदाकरीता अपात्र ठरविण्यात येत आहे.
Post a Comment