गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
Dinesh ramaji Bankar
Chip edittar
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे शेतशिवारालगत जंगल परिसरात कंपार्टमेंट 48 परिसरात 12. 7. 2025 शनिवार रोजी सायंकाळच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने चराईसाठी गेलेल्या बैलावर झडप घालून बैलाला ठार केल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतीच्या हंगामात बैल मालक शेतकरी राजेश्वर जुमनाके कोजबी यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.आणि शेतकऱ्यावर फार संकट निर्माण झाले आहे.वन विभागाने घटनास्थळावर जाऊन वाघाने ठार केलेल्या बैलाचा पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या अगोदर सुद्धा काही महिन्यापूर्वी वाघाने काही जनावरांना जखमी ठार केल्याची घटना घडली आहे .परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने जंगलाला लागून शेती असल्याने शेतकऱ्यांमध्ये वाघाबदल मोठी धास्ती निर्माण झाली आहे . वेळोवेळी शेतकऱ्यांना शेतीचा हंगाम करण्याकरिता शेतावर जावे लागत असल्याने वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोजबी येथील जनतेकडून शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.
Post a Comment