आरमोरी तालुक्यातील गणेशपुर येथे अवैद्य कोंबडे बाजारावर आरमोरी पोलिसांची धाड .पोलिसांच्या धाडीमध्ये पाच कोंबडे पाच टू व्हीलर जप्त तीन आरोपी सापडल्याची माहिती


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी ब्युरो 


.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील गणेशपूर गावा लगत जंगल परिसरात. दिनांक 13. 7 .2025 रविवार रोजी दुपारी 12 वाजे सुमारास गणेशपुर गावालगत जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैद्य कोंबडा बाजाराची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाल्याने या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस विभागाने अवैद्य सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर धाड टाकून कोंबडा बाजारातील काही कोंबडे तीन ते चार टू व्हीलर पोलीस विभागाने जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जंगल परिसरात छुप्या पद्धतीने अवैध कोंबडे बाजार भरून  कोंबड्याचा जीव घेऊन पैशाच्या लालचे पोटी सट्याच्या लालचे पोटी हे अवैद्य कोंबडा बाजार भरवणारे तरी कोण? अशी चर्चा आता गणेश पुर गाव परिसरात रंगू लागली आहे. पोलीस विभागाने अवैध कोंबडे बाजार भरविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जनतेकडून जोर धरू लागली आहे.
या अगोदर सुद्धा काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी कोंबडा बाजार भरला असल्याची परिसरातील जनतेमध्ये चर्चा सुरू आहे.

0/Post a Comment/Comments