गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
मुंबई ब्युरो
दि ०८/०७/२०२५ रोजी मुंबई येथे, विदर्भाचे भूमिपुत्र तथा मराठी मनाचे मानबिंदू सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय श्री भूषणजी गवई ह्यांनी विधिमंडळ सभागृहाला सदिच्छा भेट देऊन विधिमंडळातील सदस्य आणि लोक प्रतिनिधींशी, भारतीय संविधान या विषयावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. या सोहळ्याला विधिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
लोकशाहीच्या माध्यमातून सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करण्याची नैतिक जबाबदारी भारतीय संविधानाने लोकनियुक्त लोकप्रतिनिधींवर टाकलेली असल्याचे मत सरन्यायाधीश भूषणजी गवई यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळातील सदस्य व
लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचे स्वागत केले.
Post a Comment