गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
देसाईगंज ब्युरो
गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच -सहा वर्षा पासून रानटी हत्ती कळप मुक्कामी आहे या हत्ती कडून पाच वर्षात देसाईगंज तालुक्यासह आरमोरी, कुरखेडा, गडचिरोली तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात नूसकान केली आहे आणि या रानटी हत्ती वर ड्रोन द्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभाग यांचे कडून टीम तयार करण्यात आल्या आहेत .
देसाईगंज तालुक्यातील उसेगाव, कोंढाळा, परिसरातील जंगलामध्ये मागील काही दिवसांपासून हत्तीच वास्तव्य असल्याचे समोर आले आहे आणि ह्याच जंगल परिसरातील लागत उसेगाव येथील शेतकऱ्यांची शेती लागून आहे आणि कासवी रस्त्याच्या बाजूला श्री गोपाल चौधरी यांचा जनावरांचा गोठा आहे त्या गोठा मध्ये सुनील बोरकर यांचे ६ पोते धानाचे होते काल रात्री शुक्रवार ला काही तस्कर हत्ती ह्या गोठ्यात जाऊन ६ पोते धानाची नासधूस करून नुसकान केली .
विशेष म्हणजे ६ डिसेंबर २०२१ रोजी सुध्दा याच ठिकाणी २३ रानटी हत्ती यांनी गोठ्याच्या लोखंडी दरवाजा सह ४८ पोते सह ३३.६० क्विंटल धानाचे १८१५ रुपये प्रति क्विंटल प्रमाणे ६०९८४ रुपये नुसकान केले होते आणि वन विभाग देसाईगंज येथिल वन परीक्षेत्र अधिकारी धांडे, क्षेत्र सहाय्यक कऱ्हाडे , वन रक्षक गोगले यांनी पंचनामा केला होता मात्र अजून पर्यंत संभणधित व्यक्तीला ४ वर्ष लोटून कोणतीच नुसकान भरपाई मिळाली त्यामुळे वन विभाग यांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण होत आहे
Post a Comment