गडचिरोली सुपरफास्ट न्यूज वृत्तसेवा
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
7822082216
आरमोरी
वैरागड व वैरागड परिसरातील शेतकऱ्यांनी जंगली हत्तीचा बंदोबस्त करण्याकरिता वनविभागाला ग्रामपंचायतच्या मार्फत ने प्रशासनाला निवेदन दिले आहे .प्रशासनानी निवेदनाची दखल न घेतल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारणार असे निवेदनातून प्रशासनाला इशारा दिला आहे.
निवेदन
प्रति,
मा. सरपंच साहेब
ग्रा.पं कार्यालय वैरागड
यांचे सेवेशी
विषय: रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्याबाबत अन्यथा शेतकरी शेती व्यवसाय बंद करुन शेतक-यांना पर्याय व्यवस्था करुन देण्याबाबत
अर्जदार :- सर्व शेतकरी वर्ग वैरागड व इतर गावातील शेतकरी वर्ग
महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, मागील 3 वर्षापासुन सतत रानटी हत्तीमुळे रोज वैरागड परीसरातील शेतक-यांच्या शेतीला नुकसान करीत आहेत दिनांक 16/06/2025 ते 24/06/2025 आणि दिनांक 25/07/2025 ते 29/07/2025 पर्यंत रानटी हत्तीचा कळप वैरागड परीसरात हत्तीचा वावर असल्यामुळेसमस्त शेतक-यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे
मागील 10 दिवसापासुन शेतकरी धास्तावले असुन शेतावर जाण्यासाठीसुध्दा घाबरत आहेत पण आता शेतक-यांनी करायचे काय असा प्रश्न शेतक-याना पडत आहे कारण हाती आलेले प-हे व रोवण्याची प्रचंड प्रमाणात नासधूस करीत आहेत शेतकरी हा कर्ज घेऊन शेती करत असतो मागतलेले कर्ज बैंक किवा गटाकडुन घेतलेले कर्ज परत कसे करायचे असा प्रश्न शेतक-यांना पडत रानटी हत्तीचे कळप वारंवार नासधूस करीत आहे. तसेच आता
झालेला महापुर यांच्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आणि त्यामध्ये हत्यांची भर झाली असुन वन विभागाकडुन शेतक-यांना तीन वर्षापासुन हत्यांचा बंदोबस्त का केला नाही तरीपण वनविभाग शेतक-यांना आत्महत्तेस प्रवृत्त करीत आहे. असे शेतक-यांचे म्हणने आहे
रानटी हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची 100 टक्के भरपाई न मिळाल्यास सदर नुकसान ग्रस्त शेतकरी सामुहिक आत्महत्तेस प्रवृत होऊन आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही आणि तसे घडल्यास, या संपुर्ण गोष्टीला जबाबदार वनविभाग राहील
करीता शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई मंजुर करावे व शेतक-यांच्या मागण्या पूर्ण करुन देण्यात यावे
अन्यथा येणा-या दिनांक 04/08/2025 पर्यंत रानटी हत्तीचा बदोबस्त करावा न केल्यास शेतक-यांकडुन तीव्र आंदोलनाचा इशारा नुकसान ग्रस्त शेतक-यांडुन देण्यात येत आहे.
आंदोलन दिनांक (14/08/2025 रोजी वेळ सकाळी 11.00 वाजता ठिकाण वैरागड येथील ( आरमोरी - धानोरा रोड) महसुल मंडळ वैरागड कार्यालयात
करण्यात येत असुन आरमोरी तालुक्यातील नुकसान झालेल्या गावातील सर्व वैरागड, कोजबी, सालमारा, गणेशपुर, सिर्सी, इंजेवारी, बोरी चक, वडधा, देशपुर शेतकरी देलोडा बुज, चामोर्शी, वनखी व वासाळा क्षेत्रातील या सर्व शेतक-यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.
शेतकऱ्यांच्या अटी व शर्ती
1) सिंचनाच्या शेतीला प्रति एकर दोन लाख रुपये मदत देण्यात यावी
2) कोरडवाहू शेतीला प्रति एकर एक लाख रुपये मदत देण्यात यावी
3) जंगली हत्तीच्या उपद्रव्यांमुळे नुकसान झालेल्या पिकाच्या पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई मध्ये कपात न करता सरळ सरळ मदत देण्यात यावी
4) शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळाल्यानंतर त्याचे शेतात दुबार पेरणी केल्यानंतर जंगली हत्ती मुळे नुकसान झाल्यास किंवा वन्यप्राण्यामुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई ग्राह्य धरून पीकपंचनाम्या नुसार कोणतेही प्रकारची कपात न करता पूर्णपणे मदत देण्यात यावी .
5) वन्यप्राणी हत्ती व इतर प्राणी वनविभागाने आपल्या सीमेत ठेवण्याची हमी घ्यावी .
6) शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आठ दिवसाच्या आत देण्यात यावी. आदि संपूर्ण मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिला आहे .या निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र जण आंदोलन उभारणार असा इशारा वैरागड व परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाल दिला आहे. जन आंदोलनामध्ये वैरागड व परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment