आरमोरी तालुक्यातील गणेशपुर, शिरसी ,बोडधा ,बोरी, वडधा येथे हत्तीने केलेल्या धान्य पिकाच्या नुकसानीची मा. आमदार कृष्णा गजबे यांच्याकडून पाहनी...


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
*दिनांक:- २० जुलै २०२५*


*आरमोरी:- आरमोरी तालुक्यातील गणेशपूर, शिर्सी, बोळधा, बोरी आणि वळधा या गावांमध्ये हत्तीने केलेल्या नुकसानीची पाहणी आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार कृष्णा गजबे यांनी केली. हत्तींच्या उपद्रवामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.*

*या पाहणी दौऱ्यावेळी मा. आमदार कृष्णा गजबे यांच्यासोबत भाजपचे सचिव नंदू पेट्टेवार, मंगेश चापले, मुरमरवार क्षेत्राचे सहाय्यक वन अधिकारी श्रीकांत सेलोटे, सरपंच तुलावी तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माजी आमदार गजबे यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रशासनाकडे यावर योग्य कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.*

0/Post a Comment/Comments