गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली
आरमोरी ब्युरो
आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे वनविभागाच्या वतीने जंगलातील राखीव प्लांटेशन कंपार्टमेंट 48 लगत खुल्या जागेवर रोपवन वृक्ष लागवडीचे काम चालू करण्यात आले आहे. या रोपवान वृक्ष लागवडीमुळे गावातील बऱ्यापैकी मजुरांना रोजंदारी स्वरूपात काम
मिळाला आहे. यामुळे गावातील लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सदर वृक्ष लागवडीचे काम पोर्ला वनपरिक्षेत्र अंतर्गत शिरशी वनविभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. सदर कामाचे देखभाल क्षेत्र
सहाय्यक श्री बोगा सर यांचे मार्गदर्शनाखाली बीट वनरक्षक वाळके यांच्या देखभालित वनरोपवन वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. सदर रोपवन वृक्ष लागवडीमध्ये अंदाजे 27 ते 28 हजार रोपवान वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती आहे.
रोपवन वृक्ष लागवड होण्याअगोदर ह्याच ठिकाणी वृक्ष लागवडीकरिता गड्ड्याचे काम हाती घेण्यात आले होते
या कामांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कोजबी येथील मजुरांना रोजगार मिळाला होता..
Post a Comment