गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिर्शि ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नरोटी चक येथे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यावर खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिकांना रस्त्यावरून वाट काढत असताना मोठी कसरत करावी लागत आहे. आणि याचा त्रास सुद्धा गावातील नागरिकांना होत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन या बाबीकडे कानाडोळा करत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत प्रशासनातील पदाधिकारी यांची सुद्धा या रस्त्याबद्दल उदासीनता दिसून येत असल्याचे दिसत आहे. नरोटी चक येथील पाणीपुरवठा नळ योजना सुद्धा पंधरा दिवसापासून बंद असल्याने नागरिकांना पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न पडला असल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावे आणि पंधरा दिवसापासून गावातील पाणीपुरवठा नळ योजना बंद असलेली सुरू करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केली आहे.
कोड;
-------
शिरशी ग्रामपंचायत येथील सरपंच यांना आमच्या प्रतिनिधीने फोन केला असता त्यांचा फोनबंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
कोड;
गावातील रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी करू . ग्राम पंचायत कडे असलेल्या आर्थिक बजेटचा विचार करून नळ योजना सुरू करू.
श्री दूधबावरे
ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत शिरसी
Post a Comment