गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली -
गडचिरोली दिनांक ९जुलै 2025
गडचिरोली जिल्ह्यतील नदीकाठच्या गावांसाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे गोसीखुर्द धरणातून 13,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यतील वैनगंगा नदीच्या व नाल्यावरील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे व गडचिरोली जिल्ह्यातील गोसिखुर्द च्या पाणी वीसर्गामुळे शेकडो हेक्टर धान पीक व अन्य पिकाची शेती पाण्याखाली काही दिवस बुडते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते या नुकसानीस जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण होत आहे आणि दरवर्षी हा नुकसानीचा प्रकार अविरत सुरू आहे? परंतु यावर आजपर्यंत राज्य शासनाने व कोणताही तोडगा काढला नाही व हा नुकसानीचा प्रकार दरवर्षी असाच सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठच्या व नाल्याकाठच्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा भरपाई राज्य शासनाने द्यावा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ भारत खटी, राहुल भाऊ झोडे, प्रवक्ता ग्यानेंद विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा विश्वास, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर,विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा मडावी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानु उपाध्ये, तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,भीमराव वनकर, तालुका अध्यक्षा रुपाली कावळे यांनी केली आहे,
Post a Comment