सांगा आम्ही शाळेत जायचं तरी कसं..! रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण आरोग्य धोक्यात...


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी


अहेरी. तालुक्यातील देवलमरी केंद्र शाळा अंतर्गत येत असलेल्या कोलपल्ली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात एक किलो मीटर अंतर चिखलात हातात चप्पल घेऊन अनवाणी पायाने चिखल तुडवीत जावे लागते येथील चिमुकल्यांना शाळेत जाताना पावसाळ्यात त्रास होते पाय भरतात पाय घसरून पडणे अशी तक्रार पालक वर्ग कडून होत आहे आठशे लोकसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेचा आवारात अंगणवाडी केंद्र सुद्धा आहे अंगणवाडीत जाणारे गर्भवती महिला व लहान मुले तसेच याच रस्त्यावरून शेतात जाणारे शेतकरी व मजुरी चिखलात ये जा करीत असताना पावसाळ्यात दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे अशा अनेक नागरिकांना पावसाळ्यात अडचण होत आहे मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मूलभूत सुविधा असणाऱ्या रस्त्याचा दुर्वास्थाकडे लक्ष द्यायला तयार नाही असे तक्रार पालक वर्ग व नागरिकांकडून होत आहे

0/Post a Comment/Comments