गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली -
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे १० वे महाअधिवेशन यंदा गोवा येथे ७ आगस्ट २०२५रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम गोवा युनिव्हर्सिटी जवळ सांताक्रुज गोवा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या अधिवेशनाला गोवा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री तसेच केंद्रीय मंत्री, उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली येथील जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय येथे नुकतीच संपन्न झालेल्या मीटिंग मध्ये करण्यात आले.गोव्याला जाण्यासाठी ट्रेन आणि ट्रॅव्हल्स या दोन्ही सुविधा उपलब्ध असून इच्छुकांनी संपर्क साधावा असेही आव्हान याप्रसंगी करण्यात आले आहे.
ओबीसींच्या विविध मागण्यांकडे केंद्र व विविध राज्य सरकारांचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत असते. यात केंद्र सरकारने तात्काळ जातनिहाय जनगणना करावी, आरक्षणाची 50% ची मर्यादा हटविण्यात यावी, ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटचे वाटप करून स्वतंत्र केंद्रीय ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी. संविधानातील 243 ( D)6 व 243(T)6 मध्ये सुधारणा करून ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात 27% राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे. क्रिमिलेअरची मर्यादा २० लाख करण्यात यावी. प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी आवश्यकतेनुसार वस्तीगृहे सुरू करण्यात यावे. ओबीसी मतदार संघ तयार करण्यात यावे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावा, ओबीसी प्रवर्गातील शेतकरी आणि शेतमजुरांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावे केंद्र व राज्य सरकारी कार्यालयातील ओबीसी संवर्गातील रिक्त पदांचा विशेष भरण्यासाठी स्वतंत्ररित्या मोहीम राबवून त्वरित रिक्त पदे भरण्यात यावी, कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्ट गाव योजना लागू करण्यात यावी, यासह इतर मागण्यावर या अधिवेशनात चर्चा करून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.या अधिवेशनाला ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, सचिव सुरेश भांडेकर, कार्याध्यक्ष रामकृष्ण ताजने, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश लडके जिल्हा संघटक चंद्रकांत शिवनकर, अरुण झाडे, युवा जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर , युवा सचिव महेंद्र लटारे, जेष्ठ मार्गदर्शक दादाजी चापले एस टी विधाते, गोविंदराव बानबले, महिला जिल्हाध्यक्षा मंगला कारेकर, उपाध्यक्ष अलका गुरुनुले, महिला सचिव नम्रता कूत्तरमारे, जिल्हा संघटक सौ.सुधा चौधरी, ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास मस्के,तालुका उपाध्यक्ष रामचंद्र दशमुखे, तालुका संघटक घनश्याम जकुलवार पुरुषोत्तम मस्के, विजय गिरसावळे, सौ ललिता म्हस्के,नीता उरकुडे, आकाश आंबोरकर,प्रा दिनकर हिरादेवे , प्रा विठ्ठल निकुले,गंगाधर पाल, हिंमतराव आभारे, दामोधर मंडलवार,वैभव किरमे आदींनी केले आहे.
Post a Comment