संपादक
प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली.
गडचिरोली - साहित्यिक खेमदेव हस्ते यांचे ' मुक्त छंदाच्या वाटेवर ' हे पुस्तक समाज उपयोगी पडेल सदर पुस्तकांतून समाजाला प्रबोधन होवून बोध घेण्यासारखा आहे त्यांनी अनेक पुस्तके लिहली असे विचार रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी खेमदेव हस्ते यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
साहित्यिक - कवि खेमदेव हस्ते यांच्या ' मुक्तछंदाच्या वाटेवर चालतांना ' या पुस्तकाचे प्रकाशन विश्रामगृह गडचिरोली येथे बामसेफ प्रभारी प्रा. मनोज लोहे यांच्या अध्यक्षतेखाली रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन बामसेफ जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , रिपाई नेते गोपाल रायपूरे , कवि खेमदेव हस्ते ,कैकाडी समाजाचे नेते नागेश जग्गनाथ , सुनिता कुंभारे ,डॉ. उज्वला शेंन्डे , रिपाई उपाध्यक्ष मारोती भैसारे , दशरथ साखरे ,परशराम बांबोळे , मुंकदराव उंदिरवाडे आदि लाभले होते.
साहित्यिक खेमदेव हस्ते यांनी आजपर्यंत सम्यक क्रांती , सम्यक संम्बुद्ध , जिवनमान कथा संग्रह , आनंदी लघुकांदबरी , रंग संवेदनाचे , रानगर्भ फुलत आहे , मुक्त छंदाच्या वाटेवर आदि पुस्तके , कथा , कांदबरी व कविता लिहिल्या. हस्ते हे आपल्या गरिबितून एवढ्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. अशी माहिती भोजराज कानेकर आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगीतले. तर खेमदेव हस्ते यांनी प्रकाशन सोहळ्या प्रसंगी एवढ्या संख्येनी माझ्या पुस्तकाचे कौतुक केल्याबद्दलआनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचलन प्रमोद राऊत यांनी तर आभार नरेंद्र शेंन्डे यांनी मानले.
कार्यक्रमास आनंदराव बावणे , हेमंत बारसागडे , सुरेश मेश्राम , चोखोबा ढवळे , नाजुक भैसारे , नेताजी मेश्राम , गायक अलोणे सर , दामोधर शेंन्डे , मिथुन गेडाम , जोगेश्वर मरसकोल्हे , दिनेश बनकर , प्रेमलता कानेकर , प्रेमिला नान्होरीकर , अस्मिता मेश्राम , कविता ढोक , वाय. जी. जनबंधु , एन. एल. बांबोळे , पुनम खोब्रागडे , नलु चौधरी ' कैकाडी समाजाचे रिना कंडेलवार , सुनिता खंडेलवार ' निलपनी केदारी , समखा जग्गनाथ , नागेश कुंभारे , संजय कंडेलवार आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्त प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment