मुलचेरा वन विभागात अवैध वृक्षतोड जोमात , वन कर्मचारी कोमात, वन कर्मचाऱ्यांचा तस्करावर आशीर्वाद तर नाही ना..! चौकशीची मागणी...

.
संपादक
 मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली.



आलापल्ली - आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र पेंडीगुडम - (मुलचेरा ) वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड कत्तल सर्रास सुरु असुन शासनाची लाखो रुपयाची नुकसान होत असुन अवैध वृक्षतोड जोमात सुरु असुन मात्र वन कर्मचारी कोमात दिसत आहे. सदर वृक्षतोड प्रकरणाची योग्य चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी अशी मागणी उपवनसंरक्षक आलापल्ली यांचेकडे सामाजिक कार्यकर्ता शंकर ढालगे आलापल्ली यांनी तक्रारद्वारे केलेली आहे.
वनपरिक्षेत्र पेंडीगुडम स्थित मुलचेरा वनविभागातील गोमणी , मुखडी टोला खंड क्र. १३२ या जंगलव्याप्त भागात अवैध वृक्षतोड झालेली असुन या वृक्षतोड प्रकरणात वनपरिक्षेत्रधिकारी , वनपाल ' वनरक्षक यांची तस्करा सोबत मिलीभगत तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.


वृक्षतोड झाल्याबद्दल RFO ने याची माहीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली नाही व PoR सुद्धा करण्यात आलेला नाही. खंड क्र. १३२ मध्ये वृक्षतोड झालेल्या खोडावर ११ ला गोल करून २०२५ असे लिहले आहे. यामुळे सदर प्रकरण शंसायास्यापद वाटत असुन वनकर्मचारी व तस्कर यांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयाचे मौल्यवान सागवन वृक्षतोड केल्याने शासनाचा महसूल बुडालेला आहे.



सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ता शंकर ढोलगेआलापल्ली यांनी केली असुन कारवाई न झाल्यास उपोषणाचा ईशाराही शंकर ढालगे यांनी दिलेला आहे.

0/Post a Comment/Comments