मोखाळा. येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना, मोठ्या पदावर गेलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या माणसांना अपमानाची वागणूक दिल्या जात आहे, खासदार नामदेव किरसाण..

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
संपादक 
मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली.




सावली:-मोखाळा येथील बुद्ध विहारातून इतिहासाचे धडे दिले पाहिजे यासाठी या विहारात ग्रंथालयाची गरज आहे. खरे महामानव कोण याची जाणिव झाली पाहिजे. आज देशात काय सुरू आहे अनु जाती जमातीचे जे कोणी व्यक्ती मोठ्या पदावर गेलेत त्याना अपमानाची वागणुक दिल्या जात आहे. यांची खंत वाटतो म्हणुन बहुजनांनी आज डोळे उघडून पाहुण संघर्ष करण्याची वेळ आली आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मोखाळा येथील बुद्ध मुर्तीच्या प्रतिष्ठापणाच्या कार्यकमा प्रसंगी केले .


सावली तालुक्यातील मोखाळा येथे तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा पुज्य भदंन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी यांचे हस्ते विधिवत प्रतिष्ठापणा करण्यात आली.


कार्यक्रमाचे उदघाटन खासदार डॉ. नामदेवराव किरसान सह उदघाटक माजी खासदार अशोक नेते तर प्रमुख अतिथी म्हणुन ॲड. राम मेश्राम , कांग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे , दिनेश चिटनुलवार , रिपाईचे नेते गोपाल रायपूरे , ॲङ प्रियंका चव्हाण



 चंद्रपूर , ॲड. विनय बांबोळे , प्रा. मुनिश्वर बोरकर , दलित मित्र प्रकाश गेडाम , अविनाश पाल , तिनित गोहणे , रुपेश टिपले , खटी साहेब , केशव भरडकर , अनिल पा. म्हशाखेत्री , भिमराव खोब्रागडे , विनोद




 रोहनकर , प्रकाश फुले , रवि रायपूरे , विलास रोहणकर , जयश्री फाले , अश्विनी इंगळे , आदि उपस्थित होते. याप्रसगी माजी खासदार अशोक नेते म्हणाले की 




, तथागत बुद्धाने जगाला शांतीचा मार्ग दाखविला त्या बुद्धाची शिकवण अंगिकारणे महत्वाचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजु थेरकर संचालक प्रफुल चुनारकर यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments